मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून ( BJP ) खासदार पुनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सध्या हेच निकम 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब ( Kasab Biryani ) याला बिर्याणी मिळत असल्याच्या आरोपांवरून ट्रोल होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
उज्वल निकम हे 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट तसेच 26/11 च्या हल्ल्यामध्ये पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कासाब या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील होते. कसाबच्या खटल्यामध्ये उज्वल निकम हे जनसामान्यांपर्यंत पोहोचले. तसेच या प्रकरणात अखेर कसाबला फाशी देखील देण्यात आली. मात्र या प्रकरणात कसाबला जेलमध्ये असताना पोलिसांकडून बिर्याणी दिली जात होती. असा आरोप देखील निकम यांनी केला होता. मात्र त्यानंतर आपण ही केवळ अफवा पसरवली होती. असे देखील निकम यांनी मान्य केलं होतं.
‘या’ जुन्या मित्रासाठी राज ठाकरे घेणार सभा
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दहशतवादी अजमल कसाबने जेलमध्ये कधीही बिर्याणी मागितली नाही. तसेच निकम यांनी देखील 2015 मध्येच ही गोष्ट मान्य केली होती. तर ही अफवा पसरवण्या मागचं कारण असं होतं की, कसाबचा एक उदास फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यामुळे लोकांची सहानुभूतीची लाट त्याच्या बाजूने जात होती. मात्र अशा प्रकारे त्याच्याकडे सहानुभूती जाऊ नये. त्यामुळेच ही अफवा पसरवण्यात आल्याचा सांगण्यात आलं होतं.
मात्र अशा प्रकारे अफवा पसरवल्याने भाजपने उमेदवारी दिलेले ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब ( Kasab Biryani ) याला बिर्याणी मिळत असल्याच्या आरोपांवरून ट्रोल होत आहेत. तर निकम यांनी अेक महत्त्वाचे खटले लढले आहेत. त्यामध्ये मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, मुंबई साखळी बाँबस्फोट खटला, कोपडी बलात्कार प्रकरण, गँगस्टर अबु सालेम प्रकरण, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण यांचा त्यामध्ये उल्लेख करता येईल.