21 C
New York

Sharad Pawar : महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

Published:

उरुळी कांचन

महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देवदत्त भन्साळी आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय. जनतेच्या मनात काय आहे हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षाच्या राज्यात शेतीसाठी काय केलं असा सवाल करत पवार म्हणाले की, आज या देशातली शेती संकटात आली आहे. या सरकारच शेतीवरच लक्ष कमी होत आहे, आत्महत्या वाढायला लागल्यात मी कृषी खात 10 वर्ष सांभाळले,नंतर मोदींचे राज्य आले..माझ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले,मात्र मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, पण आज काय सुरु आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु आहे. मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाहीये,विरोधकांवर त्यांचा विश्वास नाहीये. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना,पत्रकारांना सामोरे जायचे,मोदींनी ही दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

या देशाची घटना संकटात आणण्याचे काम केलं जात आहे, या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे, आणि म्हणूनच 400 पार चा नारा ते देतायेत. पण तुमच्या माझ्या हातात आहे की कोणीही घटनेला धक्का देऊ शकत नाही हे दाखवून देण्याची ही वेळ आहे, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी नेहरूंवर टीका करतात. खर तर आज नेहरू हयात नाहीत. पणआता आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर टीका करतात, कधी उद्धव ठाकरेंवर टीका करतात, कधी राहुल गांधींवर टीका करतात. अस सांगत पवार म्हणाले की आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही, असेही पवार म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img