21 C
New York

Sairat Movie : बजेट ४ कोटी कमावले ११० कोटी! ‘सैराट’ची यशोगाथा

Published:

‘सैराट’ (sairat movie) हा सिनेमा माहित नाही असा एकही भारतीय मिळणार नाही. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोकांनी सुद्धा ‘सैराट’ वर खूप प्रेम केलं. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचं असलेलं अतिशय सुंदर असं दिग्दर्शन आणि अजय – अतुल (Ajay-Atul) यांचं सुरेल संगीत, अवीट गाणी यामुळेच सैराट सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आजही सैराट सिनेमा लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील बॉक्स ऑफिस (Box Office) वर सर्वाधिक गल्ला कमावणारा सिनेमा म्हणून ‘सैराट’ कडे पाहिलं जातं. रिंकू राजगुरुने ‘सैराट’ला ८ वर्ष पूर्ण झाली म्हणून कधीही न शेअर केलेले फोटो आता शेअर केले आहेत.

रिंकूची पोस्ट चर्चेत

रिंकूने पडद्यामागील फोटो शेअर करत.. “8 years of Sairat .. (8 years of sairat) सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली.. “असं कॅप्शन फोटो खाली दिलंय. ८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रिंकूच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, असं पोस्टवरून दिसून येत आहे.

हेही वाचा : सीएसएमटी जवळ लोकलचा डबा घसरल्याने, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प


पहिल्या फोटोत रिंकू आर्चीच्या भूमिकेत हसताना दिसतेय. दुसऱ्या फोटोत आर्ची आणि परश्या म्हणजेच सैराटची जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ह्यांनी कॅमेरामध्ये रोमँटिक अशी पोज दिलीये. तर तिसऱ्या फोटोमध्ये रिंकू आर्चीच्या भूमिकेत घोड्यावर बसली आहे. अशाप्रकारे रिंकूने ‘सैराट’ मधले कधीच न पाहिलेले फोटो इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत. त्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय. रिंकूचा सध्या ‘खिल्लार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्या शूटिंगमध्ये रिंकू व्यस्त आहे.

हेही वाचा : दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘फकिरा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमकथेच्या माध्यमातून दलित – सवर्ण संघर्ष मांडणारा सैराट मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरला आहे. त्याचबरोबर ऑनर किलिंगवरही हा सिनेमा प्रकाश टाकतो. चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात केले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सैराटमधील लोकेशन्स पर्यटनस्थळे बनली होती. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले मंदिर, आर्ची – परश्यावर एका गाण्यातील दृश्य एका वाटलेल्या झाडावर केले आहे, ते झाड पर्यटकांचे आकर्षण बनले होते.

सैराटच्या कथेने अन्य भाषांतील निर्मात्यांनाही भुरळ घातली. सैराटची पहिली पुनर्निर्मिती झाली पंजाबी भाषेत. 2017 साली प्रदर्शित झालेल्या ‘ चन्ना मेरेया ‘ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याचवर्षी कन्नड भाषेत ‘ मनसू मल्लिगे ‘ नावाने पुनर्निर्मिती झालेल्या या चित्रपटात सैराटची नायिका रिंकू राजगुरू हिनेच भूमिका केली. ओडिया भाषेत सुसांत मणी यांनी सैराटची पुनर्निर्मिती केली तर अभिमन्यू मुखर्जी यांची निर्मिती असलेला लैला ओ लैला बंगाली भाषेत बांग्लादेशात प्रदर्शित झाला. 2018 साली शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित धडक हा हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. यात ईशान खट्टर याने जान्हवी कपूरसोबत भूमिका केली. पण, मराठीतील सैराट इतके यश अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपटाला मिळाले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img