मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीतील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहे. मात्र राज ठाकरे कोणत्या उमेदवारांच्या जाहीर सभा घेणार आहे. हे अद्याप स्पष्ट नाही. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा (Sindhudurg-Ratnagiri Loksabha) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ 4 मे रोजी करिता कोकणात जाहीर सभा घेणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिल्यानंतर राज ठाकरे सर्वात प्रथम सभा नारायण राणे यांच्या करिता कोकणात घेणार आहे. माहितीच्या इतर उमेदवारांकरिता देखील राज ठाकरे सभा घेणार आहे. मात्र अद्याप त्या संदर्भातील अधिकृत तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाही आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कणकवली येथील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होईल. नारायण राणे हे भाजप आणि महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील अशी चर्चा होती. अखेर राज ठाकरे हे महायुतीच्या बाजूने प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. नारायण राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या हाडवैरामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपवर एकमेकांवर टीका-प्रतिटीका, वार-प्रतिवार केले जात आहेत. मात्र, आता राज ठाकरे मैदानात उतरल्यास नारायण राणे यांच्या प्रचाराला आणखीनच धार चढणार आहे.