21 C
New York

PM Modi : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, ‘हे’ रस्ते राहणार बंद

Published:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये ( Pune ) जाहीर सभा आणि रोड शो घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीत आज (29 एप्रिल) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज या मार्गांवरून प्रवास करण्याऐवजी पुणेकरांना पर्यायी मार्गांचा ( alternate routes ) वापर करावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात राज्यात सभा घेणरा आहेत. 29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच मोदींनी कोल्हापूरमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आज पुण्यात त्यांची सभा होईल. तर मंगळवारी पंतप्रधान मोदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मोदींची सभा म्हणजे विजयाची खात्री अशी महायुतीमधील उमेदवारांची धारणा आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांकडून मोदींच्या सभांसाठी आग्रह धरला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज (29 एप्रिल) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 3 वाजल्यापासून रेस कोर्स आणि आजूबाजूच्या रस्त्याने जाण्याचा टाळावं. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असं पुणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

‘हे’ रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा वापर करा…

यामध्ये शहरातील टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता, बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक हे रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या मार्गांवरून प्रवास करायचा असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून हे अवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये पर्यायी मार्ग म्हणून गोळीबार मैदान चौक लुल्लानगर, भैरोबानाला ते लुल्लानगर, वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी, मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी पोहचावे लागणार आहे. या मार्गांचा वापर करता येणार आहे. तसेच मोदी यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यानिमित्त अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हॉट बलून सफारी, पॅराग्लायडिंग, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन या प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

तर सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान ते भैरोबा नाला चौक हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांना भैरोबा नाला चौकातून लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जावे लागणार आहे. तर मोर ओढा चौक ते भैरोबा नाला (एम्प्रेस गार्डन रस्ता) या मार्गावरील वाहनचालकांनी मोर ओढा, घोरपडी रेल्वे फाटक, बी. टी. कवडे रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनचालकांनी वॉर मेमोरीयल चौक, घोरपडी गाव, ढोबरवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे, असे देखील वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

ड्रोन उडवण्यावर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुढील दोन दिवस शहरात ड्रोन, पॅराग्लायडर, हलकी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली आहे. पोलिसांव्यतिरिक्त अन्य खासगी संस्थांना ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करायचा असेल तर त्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img