नाशिक
लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात दोन टप्प्यात मतदान पार पडले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये (Mahayuti) काही जागेवर अद्यापही तिढा कायम आहे. नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदार संघ संदर्भात संभ्रम कायम असताना शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group) नावाने अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उमेदवारी जाहीर झाली नसताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या तीनही पक्षांकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे स्वतः इच्छुक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिले असल्याचे घरचे यांनी अनेकदा म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने छगन भुजबळ हे देखील इच्छुक आहे.
माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. आज शांतीगिरी महाराज यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरात भव्य रॅलीसह शोभा यात्रा काढण्यात आली.
परंतु सर्वात मोठा ट्वीस्ट म्हणजे अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केलेले शांतिगिरी महाराज यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच सुरू आहे. अशातच शांतिगिरी महाराजांनी महायुतीकडून उमेदवारी दाखल केल्याने चर्चा रंगली आहे.