23.1 C
New York

Maratha Reservation : “ताईसाहेब हम तुम्हारे साथ है!” पंकजा मुंडेंना ‘यांनी’ केले आश्वस्त

Published:

माजलगाव

बीड लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी (BJP) व महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांचा ताफा अडून घोषणाबाजी केल्याची घटना आज पुन्हा एकदा माजलगाव तालुक्यातील लवूळ व किट्टी आडगाव या गावांमध्ये घडली. मात्र पंकजाताई मुंडे यांनी गाडीची काच वर घेत निघून न जाता घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये जाऊन त्यांच्या मागण्यांचे समर्थन केले एवढेच नाही तर त्यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा करून त्यांचे समाधान केले.

एक मराठा लाख मराठा ही घोषणा देऊन गाड्यांचा ताफा आढळणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजाताई अत्यंत निर्भीडपणे सामोरे गेल्या. समाज भावना व त्यांचा आक्रोश समजून घेत पंकजाताईंनी अत्यंत नम्रपणे त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर आपण संपूर्ण आयुष्यात कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही असेही त्यांनी सर्वांना समजावून सांगितले.

पंकजाताई आमचा तुम्हाला विरोध नाही किंवा तुमच्यावर रागही नाही, मात्र आमचे आरक्षण हे आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हक्काचे आहे यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करावेत व तसा आम्हाला शब्द द्यावा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवले. छत्रपतींच्या विचारांचा आपण सर्वजण आदर करतो म्हणूनच आपण सर्वांनी माझे बोलणे ऐकून घेतले. मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या रस्त मागण्यासाठी तुमचा आवाज बनवून संसदेत कायम राहील असा शब्द पंकजाताईंनी यावेळी ग्रामस्थांना दिला.

मराठा युवकांवर चुकीच्या पद्धतीने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात बोलताना पंकजाताई म्हणाल्या की ज्या युवकांवर चुकीचे किंवा खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे मागे न घेतल्यास स्वतः पंकजा मुंडे उपोषणाला बसेल. किती आडगाव येथील एका शेतकऱ्याने आम्हाला विहिरीचे मस्टर काढण्यासाठी अधिकारी पैसे मागतात अशी तक्रार करताच पंकजाताईंनी ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला पैसे मागितले त्याच्या विरोधात मला तक्रार द्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला मी भाग पाडेल असा शब्द दिला.

पंकजाताईंनी अत्यंत निर्भीडपणे व मोकळ्या मनाने ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर गाडी अडवत विरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनीच ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत, पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा देत पंकजा ताईंना निरोप दिला!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img