बीड
मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अद्यापही राज्यातील वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) प्रचारार्थ दौऱ्यावर असलेल्या महायुतीच्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी आले असता मराठा समाजाच्या तरुणांकडून पंकजा मुंडे यांच्या आपल्यासमोर एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आले.
Maratha Reservation : पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून घोषणाबाजी
महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रचाराच्या अनुषंगाने गावात येताच, मराठा आंदोलक तरुणांनी एक मराठा लाख मराठा (Maratha Reservation) अशा घोषणा दिल्या. हा प्रकार बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या लवूळ गावामध्ये घडला. तर या अगोदरही पंकजा मुंडे या केज तालुक्यातील पावनधाम येथे संत तुकाराम बीज उत्सवानिमित्त गेल्या असता त्या ठिकाणी देखील पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करण्यात आली होती.
दरम्यान पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे. पंकजा मुंडे यांना भाजपच्या वतीने बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.
हेही वाचा– मनोज जरांगेंनी केले मराठा समाजाला मतदानासंदर्भात ‘हे’ आवाहन
मराठा आरक्षणाचा या नेत्यांना बसला होता फटका
मराठा समाजाच्या (Maratha Reservation) कार्यकर्त्यांकडून यापूर्वी देखील महायुतीतील नेत्यांविरोधात प्रचारात करिता गावात आले असता त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. नांदेडचे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्या गाडीचा देखील स्थापन मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आढळण्यात आला होता. त्यानंतर त्यांना प्रचार न करता गावातून माघारी जाण्याची वेळ अशोक चव्हाण यांच्यावर आली होती.
मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
पंकजा मुंडे या बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होत्या, यावेळी केज तालुक्यात एका सप्ताहाच्या कार्यक्रमाला जात असताना मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) पंकजा मुंडे यांची गाडी अडवली आणि त्यांने पुढे जाण्यापासून रोखलं. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा रस्ता अडवत घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली असून मतदारसंघातील भेटीगाठी वाढवल्या आहेत. केज तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं.केज तालुक्यातील औरंगपूर येथे पंकजा मुंडे या पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.