19.7 C
New York

Harbour : सीएसएमटी जवळ लोकलचा डबा घसरल्याने, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Published:

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ (CSMT) लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर (Harbour) मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हार्बर मार्गावरील पनवेल हून सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन सीएसएमटी ते मस्जिद स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी ११.४३ मिनिटांनी घडली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. वडाळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या वाहतुकीवर परिणा झाला आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img