23.1 C
New York

Eknath Khadase : खडसेंचा भाजपप्रवेश का रखडला ?

Published:

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांनी भाजपवापसीचे ( BJP ) संकेत दिले होते. पण आता या घोषणेला अनेक दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेलेच नाहीत. दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे खडसेंचे राजकीय भवितव्य अनिश्चित दिसत आहे. तसेच हा पक्षप्रवेश रखडण्यामागे एक सांगितले जात आहे. खडसेंचा भाजपप्रवेश रखडण्यामागे एक कारण सांगितले जात आहे. ते कारण म्हणजे भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे की, जर ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खडसेंचा भाजपप्रवेश झाल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीवर विपरित परिणाम होऊ शकतो. ज्याचं पक्षाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने हा प्रवेश पुढे ढकलला आहे.

दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिकीट दिले. रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. भाजपाच्या चारशे पारच्या घोषणेत एक-एक खासदार महत्वाचा आहे. त्यामुळे रक्षा खडसे कोणत्याही परिस्थितीत विजयी झाल्या पाहिजेत. यासाठी एकनाथ खडसेंची मदत घेण्याची दिल्लीतील नेत्यांची भूमिका आहे. त्यासाठी खडसे यांना पुन्हा पक्षात आणण्याचा या नेत्यांचा विचार आहे. स्वतः खडसे यांनीच या चर्चांना दुजोरा दिला होता. मात्र, यानंतर पुढं काहीच घडलं नाही.

दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी सन 2009 ते 2014 या काळात एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 120 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. खडसे यांना मात्र काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागले. यानंतर 2016 मध्ये एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढील चार वर्षे ते राजकारणात विजनवासात पडले होते.

पुढे 2020 मध्ये मात्र त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील चाळीस वर्षे भाजपात राहिल्यानंतर पक्ष का सोडावा लागला याचं उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण खडसेंनी मात्र शरद पवार गटातच राहणे पसंत केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img