21 C
New York

Drugs : गुजरात किनाऱ्याजवळ पाकिस्तानी बोटीत सापडले 600 कोटींचे ड्रग्ज

Published:

भारतीय तटरक्षक दलानं गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपयांचे 86 किलो अमली पदार्थ (Drugs) जप्त केले. भारतीय तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक (ATS) तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बोटीतून 14 जणांना अटक करण्यात आली आहे. अरबी समुद्रात ही कारवाई गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त समन्वयानं रात्रभर ही कारवाई करण्यात आली. मात्र पाकिस्तानी बोटीतून कोणते ड्रग्ज जप्त करण्यात आले, हे तटरक्षक दलाने अद्याप उघड केलेले नाही. (Drugs worth 600 crores found in Pakistani boat near Gujarat coast)

गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय पाण्याच्या आत शोध मोहीम राबवत होती. सदर कारवाई करण्यासाठी तटरक्षक जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. याशिवाय आयसीजी जहाज राजरतननही या कारवाईचा भाग होता. जहाजाच्या विशेष पथकाने संशयास्पद बोटीवर चढून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची पुष्टी केली. मात्र, पाकिस्तानी बोटीतून कोणतं ड्रग्ज जप्त करण्यात आलं, हे तटरक्षक दलानं अद्याप उघड केलेले नाही. ही कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. आयसीजी जहाज राजरतननेही या कारवाईत भाग घेतला. जहाजाच्या विशेष पथकानं संशयास्पद बोटीवर चढून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची पुष्टी केली. पाकिस्तानी बोटीवर असणाऱ्या 14 जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं.

भारतीय तटरक्षक दलाने गुप्तचरांच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन केले. ज्यामध्ये पाकिस्तानी बोटीच्या 14 कर्मचाऱ्यांसह 602 कोटी रुपयांचे सुमारे 86 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या सहकार्याने यशस्वी ऑपरेशन केले.भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ सुरक्षा यंत्रणा भारतीय पाण्याच्या आत शोध मोहीम राबवत असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींना चौकशीसाठी पोरबंदर येथे आणण्यात येत आहे. दरम्यान, एनसीबी आणि हिंदुस्थानी नौदलाने फेब्रुवारी महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीजवळ सर्वात मोठी कारवाई केली होती. या संयुक्त कारवाईत तब्बल 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ज्याची किंमत जवळपास 1 हजार कोटींहून अधिक होती.

124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त

एटीएसनं 22 किलो मेफेड्रोन आणि 124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, “अहमदाबादचे मनोहर लाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंग राजपुरोहित यांनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी युनिट्स स्थापन केल्याची माहिती एटीएसला मिळाला होती. त्यानंतर छापा टाकण्यात आला.”

राजपुरोहितसह एनानीला अटक

राजपुरोहितला गांधीनगर येथून तर एनानीला सिरोही येथून अटक करण्यात आली. एनानी यांनी अशाच एका प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्याला 2015 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयानं (DRI) मेफेड्रोनच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपी किती दिवसांपासून अमली पदार्थांचं उत्पादन करत होता? याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या टोळीमध्ये कोण कोण आरोपी सामील आहेत? याचाही शोध घेतला जात आहे.

आरोपींनी केला गोळीबार

25 आणि 26 तारखेच्या रात्री पाकिस्तानी बोटीची ओळख पटवण्यात आली. यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने अल रझा बोट पकडली. या काळात गोळीबारही झाला. यानंतर एटीएसचे दुसरे पथकही या कारवाईसाठी रवाना झाले. अल रझा बोटीने आत्मसमर्पण केले तेव्हा या बोटीवर 14 पाकिस्तानी तस्कर होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 86 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 600 कोटी रुपये आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img