छत्तीसगडमधील ( Chhattisgarh ) बेमेतरा या जिल्ह्यामधून एक धक्कादायक (Chhattisgarh Accident) बातमी समोर आली आहे. या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये ( Truck-Pick Up Accident ) एकाच कुटुंबातील तब्बल आठ जणांचा मृत्यू ( Dead ) झाला आहे. तसेच 23 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा बेमेतरा जिल्ह्यातील कठीया या गावाजवळ ही दुर्घटना घडली. एका कार्यक्रमाहून परत येत असताना या पिकअपला एका मालवाहू वाहनाने धडक दिल्याने हे दुर्घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पाच महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
या मृतांमध्ये भुरी निषाद ( वय 50 ), निरा साहू (वय 55), गीता साहू (वय 60 ), आग्नेय साहू (वय 60 ), खुशबू साहू (वय 39 ), मधु साहू (वय 5 ), रिकेश निषाद ( वय 6 ), ट्विंकल निषाद ( वय 6), यांचा समावेश आहे. तर 23 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना रायपूर येथील एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली…
या अगोदर त छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला होता. बस खाणीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून आधिक प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले होते. या भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता.