मुंबई
प्रशासकीय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (Mahendra Kalyankar) यांची आज कोकण विभागीय आयुक्त पदावरून मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई या पदावर एस एम लोखंडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर प्रशासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
महेंद्र कल्याणकर यांच्या कोकण विभागीय आयुक्त पदावर पी. वेलरासू यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे परिपत्रक सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील २००७ बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणूनही काम केले आहे, ठाणे जिल्हाधिकारी असताना डॉ. कल्याणकर यांचा दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.