छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे. नम्रतानं नुकत्याच एका मुलाखतीत (Aamir Khan) महाराष्ट्राची हास्यजत्रेतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमधून फो आल्याचा खुलासा केला आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
नम्रता म्हणाली, “मला काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या प्रोडक्शनमधून चित्रपटाच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. स्वत: आमिर खान सरांनी माझं नाव सुचवलं, असं त्यांनी मल सांगितलं. माझ्याशी त्यांना संपर्क करता येत नव्हता. त्यांनी मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. पण, तो मेसेज रिक्वेस्टमध्ये गेला. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले की 20 दिवसांपासून आम्ही तुम्हाला कॉल करत आहोत.”कॉलवर नम्रताला सांगितलं की “आगामी प्रोजेक्टसाठी आमिर खान सरांनी तुमचं नाव सुचवलं, म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो.”
“ही एका खलनायिकेची भूमिका आहे. मी ऑडिशन तर दिलंय. मी ऑडिशन तर दिली आहे. मी यात सिलेक्ट होईन की नाही? ही भूमिका मला मिळेल की नाही, हे मला माहीत नाही. पण, मी इथपर्यंत पोहोचले. हेच माझ्यासाठी खूप आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” असंही पुढे नम्रताने सांगतिलं. आता लवकरच महाराष्ट्राची ही लाडकी अभिनेत्री ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर 1 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.