23.1 C
New York

WhatsApp : व्हाट्सअपवरून फोटो पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही

Published:

आपल्याला व्हाट्सअपवरून (WhatsApp) फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही फाईल पाठवायची असेल तर त्यासाठी इंटरनेट लागत होते. व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणणार आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवायही फाइल्स शेअर करू शकाल. लीक झालेल्या माहितीनुसार, हे मेसेजिंग ॲप लवकरच असे टेक्निक आणणार आहे, ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय फोटो, व्हिडिओ, गाणी आणि डॉक्युमेंट्स पाठवू शकाल.याबाबतची माहिती WABetaInfo कडून देण्यात आली आहे. याकरिता फक्त मोबाईलमधले ब्लूटूथ चालू करण्याची आवश्यकता असेल.

WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे युजर्स ला व्हाट्सअपवरून फाईल, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. इंटरनेटशिवाय व्हाट्सएपवर फाइल्स शेअर करण्यासाठी काही परमिशन आवश्यक असतील. ब्लूटूथद्वारे जवळपासचे फोन शोधण्याची ही सर्वसाधारण परवानगी आहे, जी तुम्ही हवे असल्यास बंद देखील करू शकता. तसेच युजरने ॲपमध्ये तीच स्क्रीन ओपन केली असेल आणि दुसऱ्या डिव्हाइससाठी परवानगी दिली असेल तरच दोन्ही डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट होऊ शकते. या प्रक्रियेला ऑप्ट-इन असे म्हणले जाते. या सर्व प्रक्रियेत फाईल पाठवणाऱ्याचा आणि प्राप्तकर्त्याचा फोन नंबर दिसणार नाही. यामुळे दोन्ही बाजूची माहिती गोपनीय आहे. ही नवीन फाईल शेअरिंग पद्धत सोपी आणि सेफ करेल.

दरम्यान, सध्या दिवसेंदिवस होत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विविध फीचर्स युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी देखील व्हाट्सअपकडून आपल्या युजरसाठी अनेक खास फीचर्स लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आता इंटरनेटशिवाय फाईल, फोटो व इतर माहिती पाठवण्याचे देखील फीचर व्हाट्सअपकडून आणले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Whatsapp वरून आता लवकरच इंटरनेटशिवाय माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करता येणार आहेत, यावर अजून व्हॉट्सअपच्या तज्ज्ञांचा रिसर्च सुरू आहे. (WhatsApp) त्यासाठी ब्लूटुथची मदत घेता येईल. या परवानग्या असूनही इतर उपकरणे कनेक्ट करण्यासाठी पुरेशी जवळ आहेत की नाही हे तपासण्यासाठी ॲपला Location ऑन करण्याची आवश्यकता असेल.

WABetaInfo ने सांगितले की व्हाट्सऍपची टिम या फीचरवर वेगाने काम करत आहे. जेणेकरून यूजर्स इंटरनेट कनेक्शनशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या फाइल्स शेअर करू शकतील. शेअर केलेल्या फायली देखील एनक्रिप्ट केल्या जातील. जेणेकरून कोणीही त्यांच्याशी छेडछाड करू शकणार नाही. अँड्रॉइड फोन्ससाठी व्हॉट्सॲप बीटा वरून एक स्क्रीनशॉट लीक झालेला आहे. त्यात हे स्पष्ट दिवस आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीला फोटो,व्हिडिओ पाठवणार आहात, तो तुमच्या जवळपास असेल तर त्याचे अकाऊंट शोधून इंटरनेट सुविधा बंद करूनही तुम्ही त्याला फोटो पाठवू शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img