मुंबई
मुंबई भाजप (Mumbai BJP) अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज सकाळी वांद्रे पश्चिम या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पदयात्रा करून मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला व महायुतीचे उमेदवार अँड उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अॅड उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा काल झाली असली तरी महायुतीच्या प्रचाराला त्यापुर्वीच सुरुवात झाली आहे. विधानसभा निहाय मेळावे झाल्यानंतर आता थेट जनसंवादला सुरुवात करण्यात आली आहे. आमदार अँड आशिष शेलार वांद्रे पश्चिम विधानसभा सह मुंबईतील विविध भागात छोट्या छोट्या बैठका करुन जनसंवाद साधत आहे. त्यांनी गेल्या आठ दिवसांत वांद्रे परिसरात 20 हून अधिक बैठका घेतल्या असून आज उमेदवार जाहीर झाल्यानंतर थेट प्रचाराचा प्रारंभ करत सकाळी कार्टर रोड, जुहू उद्यानात, प्रोमोनाड येथे मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जनसमर्थन नागरिक देत असून मुंबईकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहतील असे चित्र पहायला मिळते आहे, अशी प्रतिक्रिया अँड शेलार यांनी दिली आहे.
उत्तर मध्य मुंबई भाजपचे उमेदवार जेष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड ह्या रिंगणात आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पूनम महाजन भाजपचे जेष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या आहे.