23.1 C
New York

Uddhav Thackeray : राणेंच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

सिंधुदुर्ग

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मतदार संघाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला. अरे शिवसेना आख्खी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात कितीवेळा यावं लागलं होतं? कारण आख्खी शिवसेना त्यांच्यासोबत होती असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात आहे, हे आठवत नाही.  इतके वर्ष स्वत: सकट स्वत:ची पिलावळ, जिकडे सत्ता तिकडे तुम्ही झुकता, सगळी मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं. एकतरी लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही इतके वर्षानुवर्षे जीवापाड जपलेला धनुष्यबाण चोरला आणि कोकणात तो सुद्धा गायब करुन टाकला. म्हणजेच काय त्या लाचाऱ्यांना, खोक्यात जे बसले आहेत, हे गद्दारांचे दिल्लीत जे दोन मालक बसले आहेत ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहिती नाही अजून की, कोकणात जांबा दगड आहे. हा जांबा दगड एकेकाळी लाव्हारस होता. याचा अर्थ असा नाही तो पुन्हा लाव्हा होणार नाही. आज संपूर्ण कोकणात नाही, आख्ख्या महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लाव्हारस उसळून आला आहे. मोदींना अजून काही तो सूरच लागत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता तिकडे गेला. तसं आता भारताच्या राजकारणात झाला. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटीकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी 2019 आणि 2014 चा आत्मविश्वास दिसत नाही. आपण फसलो होतोच. मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती. त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सबपे भारी. अशी मस्ती होती. छाती छप्पन इंचाची होती. आता त्या छातीमधील हवा गेली. एक अकेला सब पे भारी आणि आजूबाजूला सब भ्रष्टाचारी अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img