5.5 C
New York

Sindhudurg Ratnagiri Loksabha : नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Published:

सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जाहीर सभा होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा (Sindhudurg Ratnagiri Loksabha) मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेपूर्वीच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. यावर आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे तिसरा टप्पा सात मे रोजी पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज मतदार संघ असलेल्या बारामती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदार संघाचा समावेश आहे बारामती मध्ये शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये राणे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विजय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शहरातील जलतरण तलावाजवळील मैदानावर सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची सभआ होईल.

तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे मैदानात उतरले आहेत. शहरातील शिर्के हायस्कुल येथे आज सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला मनसे नेते , अविनाश जाधव , संदिप देशपांडे , नितीन सरदेसाई , प्रकाश महाजन , वैभव खेडेकर , जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांची उपस्थिती असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img