भाजपाने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांना (Poonam Mahajan) संधी नाकारत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं. या मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. अखेर या मतदारसंघात भाजपने लोकप्रिय चेहरा म्हणून निकम यांना (Ujjwal Nikam) उमेदवारी जाहीर केली. या घडामोडींनंतर खासदार पूनम महाजन यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते. माझे वडील स्व. प्रमोद महाजन यांनी मला नेहमीच राष्ट्र प्रथम नंतर आपण हा जो मार्ग दाखवला तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना होणारा विरोध पाहता आता भाजपकडून या मतदारसंघात उज्ज्वल निकमयांना संधी देण्यात आली आहे.
ट्विटमध्ये पूनम महाजन म्हणतात…
पूनम महाजन Poonam Mahajan यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शनिवारी(ता.27) ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात,गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली.त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यांनी ट्विटमधून मानले आहे.
तसेच मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील.आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी मला राष्ट्र पहिलं,नंतर आपण ही शिकवण दिली आहे.आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते.माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, अशा शब्दांत आपल्या भावनांना पूनम महाजन यांनी वाट मोकळी करुन दिली आहे. पूनम महाजन यांच्या उमेदवारीला मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनच तीव्र विरोध सुरू होता.भाजपने आपल्या जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान खासदार महाजन यांचा समावेश केलेला नव्हता. त्यामुळे महाजन यांचा पत्ता या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.