23.1 C
New York

Mohan Bhagwat : आरक्षणाच्या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Published:

मुंबई

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात गेल्या आठ ते दहा महिन्यापासून रान पेटलेले आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंगचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील आरक्षणा (Reservation) विषयावर महत्त्वाचे विधान केले आहे. मोहन भागवत यांनी केलेले हे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, जिथपर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे. तिथपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली पाहिजे असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते हैदराबाद येथील तेलंगणातील एका शैक्षणिक संस्थेत एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले आहे.

मोहन भागवत म्हणाले की, संघाने सुरुवातीपासूनच संविधानानुसार दिलेल्या आरक्षणाने पाठिंबा दिला आहे परंतु काही समाजकंटक खोटा व्हिडिओ प्रसारित करत संघाची बदनामी करतात आरक्षण आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे अशी नेहमीच संघाची भूमिका होती काही गटांना दिलेले आरक्षणला संघ परिवाराने कधीच विरोध केलेला नाही आहे असे देखील मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

मोहन भागवत यांनी गेल्या वर्षी नागपुरात सांगितले होते की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. भेदभाव, जरी अदृश्य असला तरीही तो समाजात अस्तित्वात आहे. आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे हे वक्तव्य आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img