23.1 C
New York

Mahadev Betting App : महादेव अ‍ॅप प्रकरणात ‘या’ अभिनेत्याला छत्तीसगडमधून अटक

Published:

महादेव अ‍ॅप बेटिंग (Mahadev Betting App) प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याआधी साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले. त्याला आता लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते की गुन्ह्याचे स्वरुप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणात मोठी रक्कम गुंतलेली आहे.

याआधी गुरुवारी एसटीएफने दोन गुन्हेगारांना अटक केली होती. यातील एक आरोपी हा दुबईत असलेल्या सूत्रधाराचा चुलत भाऊ आहे. याला या कंपनीचे देशाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. द लायन बूक अॅप नावाच्या अॅपमध्ये साहिल खान भागीदार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयातही त्याची चौकशी करण्यात आली होती. सध्या पोलिसांनी त्यााल फक्त ताब्यात घेतले आहे. पुढे पोलीस त्याला अटक करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

साहिल खानने अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केला होता. न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळली. त्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. पुढे गोवा, कर्नाटक, हैद्राबादमार्गे छत्तीसगडमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याचा शोध घेत होतेच. अखेर त्याला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून ताब्यात घेण्यात आले. आता त्याला लवकरच मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही आरोप झाले होते. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या काळातच हे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी बघेल यांना चांगलेच घेरले होते. निवडणूक प्रचारावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यानंतर स्वतः बघेल यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित अशा प्रकारच्या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img