5.5 C
New York

Mahadev Betting App : महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी

Published:

मुंबई

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev Betting App) अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छत्तीसगड मधून शनिवारी ताब्यात घेतले होते. आज साहिल खानला कोर्टात हजर केले असता 1 मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सोनवण्यात आली आहे.

महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात अटकपूर्व जामीनाकरिता साहिल खाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज होता त्यानंतर मुंबई पोलिसांनी छत्तीसगड मधून शनिवारी साहिल खानला ताब्यात घेतले होते त्यानंतर आज मुंबईत आणल्यानंतर त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
महादेव बेटिंग या ॲप प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेटिंग ॲपसंबंधित सर्व संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात होती. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता साहिल खान याचं नाव बेटिंग ॲप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. माटुंगा पोलिसांनील आधीच 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे.

याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग ॲपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. त्यावेळी तो व्हिडीओ प्रमोशनल व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण एफआयआरमध्ये ॲप ऑपरेटर म्हणून नाव आल्याने साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहेत. खिलाडी नावाचे बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणी ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img