23.1 C
New York

Indian Coast Guard : तटरक्षक दलाच्या कारवाईत अरबी सुमुद्रात 600 कोटींचे ड्रग्ज जप्त

Published:

मुंबई

अरबी समुद्रात अमली पदार्थाची एक मोठी खेप पकडण्यात भारतीय तटरक्षक दलाला (Indian Coast Guard) यश आले आहे. गुजरात पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या सोबत संयुक्त कारवाई गुजरातच्या किनारपट्टीवर ही मोहीम फतेह केली. बोटीतून 14 पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल 86 किलो अमली पदार्थ (Narcotics) जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 602 कोटी इतकी किंमत आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस तसेच गुजरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी रात्रभर चित्तथरारक कारवाईत केली. तटरक्षक दलाने बोटीला घेरताच त्या पाकिस्तानी बोटीतील 14 कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबार करत तटरक्षक दलाने त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईसाठी तटरक्षक दलाने आपली जहाजे तसेच विमाने तैनात केली होती. या कारवाईत तटरक्षक दलाच्या राजरतन जहाजाने सहभाग घेतला. पाकिस्तानी बोट आणि त्यावरील 14 क्रू मेबर्सना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी पोरबंदरला आणण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img