21 C
New York

Chhagan Bhujabal : छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

नाशिक

मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यातील शाब्दिक चकमक सुरूच आहे. प्रसार माध्यमाची बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदीसाहेबांपेक्षा फार मोठा नेता. त्यामुळे संपूर्ण देश जरांगेंना घाबरतो. त्यांची अक्कल हुशारी किती. काहीही बडबड करतात. ते नाशकात येऊन बोलतात ओपनची जागा आहे. ओबीसींनी लढू नये. बीडमध्ये जाऊन म्हणतात ओपनची जागा आहे. ओबीसींनी लढू नये. पण त्यांना एवढेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत, लोकसभेत आरक्षण नाही. मी कोणालाच्या बापाला घाबरत नाही, उमेदवारी जाहीर करायला उशिर झाला म्हणून मी नाशिकमधून माघारी घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

छगन भुजबळ म्हणाले की, आता आम्हीसुद्धा येवला ओपन आहोत. तिथून निवडून येतो. समीरभाऊसुद्धा ओबीसी असून इथूनच खासदार म्हणून निवडून आले. ते तर पूर्वी असं पण बोलले होते की मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही. पण मोदीसाहेबांच्या तर एवढ्या जंगी सभा होतात. सध्या ते गिनतीत सुद्धा नाहीत. उगाच बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही असा टोला त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे.

नाशिकमधून माघार घेतल्याबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी उमेदवारी जाहीर करा म्हणून. अर्ज भरायला देखील सुरुवात झाली. मला वाटलं माझ्यामुळे अडला असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल असं मला वाटतं. आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही जागा निवडून आणू असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img