बॉलिवूडच्या ९० च्या दशकातील ओळखले जाणारे कलाकार एका मंचावर धुमाकूळ घालतायत. ‘धकधक गर्ल’ म्हणजेच माधुरी दीक्षित, (Madhuri Dixit) संपूर्ण इंडस्ट्रीत ओळखला जाणारा ‘अन्ना’ म्हणजेच सुनील शेट्टी तर लोलो म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजेच करिष्मा कपूर ह्या तिघांनी ‘डान्स दीवाने’ (Dance Deewane) च्या रंगमंचावर धमाल केल्याचा प्रोमो आणि व्हिडीओ व्हायरल होतोय. अनेक वर्षांनी ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमामुळे तिघांची पुन्हा एखदा भेट झाली आहे.
करिष्मा कपूर (Karishma Kapoor) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्यावर चित्रित झालेलं “झांझरिया…”हे गाणं त्यावेळी सुप्रसिद्ध झालेलं. १९९६ मध्ये ‘कृष्णा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर अभिजीत भट्टाचार्य यांनी गाणं गायलं होत. आता पुन्हा एखदा २८ वर्षांनी याच गाण्यावर दोघंही थिरकले आहेत. ‘डान्स दीवाने’चा हा विडिओ पाहून प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झालेलं “झांझरिया” ह्या गाण्याला आता २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. करिष्मा आणि सुनील शेट्टी ला ह्या गाण्यावर डान्स करताना पाहून माधुरी दीक्षितने शिट्या मारायला सुरुवात केली. ‘धकधक गर्ल’ला सुद्धा शिट्या वाजवण्याचा मोह आवरला नाही. तिने मनभरून दोघांचं कौतुक करत शिट्ट्या वाजवल्या. दोघांना थिरकताना पाहून माधुरी दीक्षित सुद्धा मोठमोठ्याने व आनंदाने प्रोत्साहन देत होती.
“झांझरिया…” गाण्याबरोबरच ‘डान्स दीवाने’ मध्ये करिष्मा आणि माधुरीचा ‘दिल तो पागल हैं’ डान्स सुद्धा पुन्हा एखदा पाहायला मिळणार आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर रात्री ९.३० वाजता येत्या शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या ह्या प्रोमो व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
३ लेजेंड्स, नाइस जोडी, एव्हरग्रीन सॉंग, सुपरहिट जोडी अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे .