21 C
New York

Satara Loksabha : शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

Published:

नवी मुंबई : सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर वाशीच्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

शशिकांत शिंदे यांच्यावर याआधीच बाजार समितीतीत शौचालय बांधकामात घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर हा नवा गुन्हा दाखल झाला आहे. २००९ साली बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने मसाला मार्केटमधील ४६६ गाळेधारकांना ६०० रुपये चौरस फूट दराने जादाचा एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक त्यावेळी रेडीरेकनर ३०६६ रुपये असताना संचालक मंडळाने केवळ ६०० रुपये आकारल्याने राज्य सरकारचे यात नुकसान झाले आहे, असा ठपका बाजार समितीच्या सचिवांसह २४ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवहारात शासनाचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

याआधीच्या शौचालय घोटाळ्यात बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांना अटक झाली आहे, तर शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. गुन्हा दाखल असलेल्या अन्य संचालकांवर अटकेची तांगती तलवार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img