23.1 C
New York

Salman Khan : सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याचे आदेश! नेमकं प्रकरण काय?

Published:

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर रविवार (१४ एप्रिल) रोजी काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात मुंबई पोलीस गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गुजरातच्या भुजमधून दोन आरोपींना पकडले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी दन आरोपींना पंजाब येथून अटक केली असून मुंबई पोलिसांचे पथक गुरूवारी रात्री आरोपींना घेऊन मुंबईत दाखल झाले. या दोन्ही आरोपींवर शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. या दोन्ही आरोपींवर शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे.


मात्र, या प्रकरणात आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. गुजरातमधून पकडलेले आरोपी बिहारमध्ये सागर पालने 4 गोळ्या झाडल्या आणि विकी गुप्ताने 4 गोळ्या झाडत गोळीबार करण्याचा सराव केला. होळीच्या दिवशी दोन्ही आरोपी बिहारमध्ये आपल्या गावी गेले होते. तिथे सराव करण्यासाठी दोघांनी ८ गोळ्या झाडल्याची माहिती आहे. दोघांनी कधीही गोळ्या झाडल्या नसल्याने त्याना सर्व करण्यासाठी बिहारमध्ये त्यांना सराव करण्यास सांगितले होते. पंजाबमधून अटक करण्यात आलेले आरोपी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुजकुमार थापन यांनी पनवेलमधील दोन्ही शूटर्सना 38 गोळ्या आणि 2 पिस्तूल दिले.


सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. मात्र दुचाकीवरून ते शक्य झाले नसल्याची माहिती आरोपींनी दिली. तरी देखील, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img