3.6 C
New York

Sahil Khan: अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळले!

Published:

अभिनेता साहिल खानच्या (Sahil Khan) अडचणीत वाढ झाली आहे. महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

साहिल खानवर ऑनलाइन बेटिंग एप्लीकेशन्सचे प्रमोशन केल्याचा आरोप आहे. याआधी सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साहिल खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही जामीन फेटल्यामुळे साहिलच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात साहिलचा जबाब मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला आहे.


या संपूर्ण गुन्ह्याचे स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणात मोठ्या संख्येने बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरण्यात आली आहेत. त्यामुळे साहिल खानला ताब्यात घेऊन तपास करणे गरजेचे आहे. याबाबत कोर्टाने म्हंटले की, “त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही.” यामुळे साहिलच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. या प्रकरणाबाबत त्याच्या चाहत्यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img