3.5 C
New York

Onion Export Duty : मोदींचं कांदा उत्पादकांना मोठ्ठं गिफ्ट…

Published:

लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे. (Onion Export Duty) कांद्याच्या प्रश्नावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून गुजराला (Gujrat) एक न्याय व महाराष्ट्राला वेगळा न्याय का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांचा कांदा (Onion) निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना, मोदींच्या महाराष्ट्रातील आगमानापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. केंद्र सरकारने योग्यवेळी हा निर्णय घेतला आहे. उन्हाळी कांदा अजून शेतात आहे. या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना होणार आहे. आता कांदा काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे.

रविकांत तुपकरांचा सवाल

कांदा निर्यातीचा निर्णय घ्यायला सरकार इतके दिवस झोपलं होतं का?, असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. सरकारला हा उशीरा सुचलेला शहाणपणा आहे. विशिष्ट मतदारांचे लाड पुरवण्यासाठी सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेतं, असा आरोपही रविकांत तुपकर यांनी केला आहे. शेतकरी मेला तरी चालेल, मात्र यांचा विशिष्ट मतदार टिकला पाहिजे, अशी यांची पद्धत आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असा दावाही रविकांत तुपकर यांनी केला. केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांचा भलं करायचं असतं, तर निर्यातबंदी लागू केलीच नसती, असं रविकांत तुपकर यांनी सांगितले.

सध्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. आज मोदी सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावरील निर्यातीवर बंदी आज उठवली आहे. (Onion Export ) सुमारे 4 महिने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागल्यानंतर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

5 महिन्याासून कांदा निर्यात बंदी

या निर्णयानुसार 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु, गेली 5 महिन्याासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचं काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

या देशात कांदा निर्यात होणार

सरकारने या निर्णयानुसार 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश आहेत. भारताचा या देशात कांदा निर्यात होणार आहे. तसंच, 2 हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती व काही युरोपियन देशात निर्यात केली जाणार आहे

शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं

8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ती 31 मार्चपर्यंत राहणार असं सांगितलं होतं. परंतु, मार्चलाही ही बंदी उठवली नाही. त्यामुळे मार्च महिन्याची वाट पाहून कांदा ठेवलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. सुमारे 5 महिन्यांनी ही निर्यात बंदी उठवली आहे. आता काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठ नुकसानही झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img