8.7 C
New York

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बसने घेतला पेट

Published:

पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) आज मोठी दुर्घटना टळली आहे. खाजगी बसने अचानक पेट घेतला होता. टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने बसने अचानक पेट घेतला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे.(The Burning Bus On Mumbai Pune Expressway)

सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत साडे सातच्या दरम्यान खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळे बस जागेवरच पेटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतवरून दिलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सगळे प्रवासी सुखरुप बचावले. शिवाय ही आग एवढी मोठी होती की साधारणपणे अर्धातास ही आग विझवण्यासाठी लागलेल. त्यातच रस्त्यातच बस पेटल्याने काही वेळ वाहतूक थांबवावी लागली होती आणि त्याचमुळे सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांनी बर्निंंग कारचा थरार अनुभवला.

मोठी दुर्घटना टळली…

बसचा अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना झाली असती. अनेक प्रवासी दगावण्याची भीती होती. त्यात सर्व वयोगटातील प्रवाशांचा समावेश होता. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि मोठा अपघात टळलाय.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस केंद्र वडगाव हद्दीत किलोमीटर 78 पुणे लेनवर सकाळी 7.00 च्या सुमारास खाजगी टॅव्हल बसचा टायर फुटून आग लागली व शॉट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी प्रवास करत होते. आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img