26.6 C
New York

Mumbai Indians : मुंबईची पुन्हा एकदा अपयशी झुंज ; दिल्ली ठरली सरस

Published:

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 42 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik pandya) क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने अतिशय आक्रमक फलंदाजी करत मुंबईला २५८ धावांचे टार्गेट दिले होते. या पश्चात मुंबईच्या फलंदाजांना २४७ धावांपर्यंत मजला मारता आली. मुंबईकडून तिलक वर्मा सोडून बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरले.

दिल्लीची फलंदाजी पाहून मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या अस्वस्थ होता. दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण कसे करायचे हा हार्दिकसमोर प्रश्न होता. यावेळी रोहित शर्माने हार्दिकला मदत केली. याव्यतिरिक्त एका मुद्द्यावरून हार्दिकने थेट अंपायरशी चकमकही दिली. हार्दिकचा अंपायरवर रागावल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

दिल्लीच्या आक्रमक सुरुवातीमुळे कर्णधार हार्दिक पंड्या आधीच तणावात होता. विकेट मिळत नसल्याने हार्दिक चिडला होता. विकेट मिळाल्यानंतर मात्र दिल्लीचा दुसरा फलंदाज मैदानात येण्यास उशीर झाला. त्यामुळे हार्दिक अतिशय चिडला. दरम्यान, हार्दिकने पंचांशी वाद घातल्याचेही समोर आले. नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निर्धारित वेळेत डाव संपवावा लागतो. याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधारावर आहे. संबंधित संघ निर्धारित वेळेत संबंधित षटके पूर्ण करू शकला नाही, तर कर्णधाराला स्लो ओव्हर रेटनुसार दंड आकारला जातो. त्यामुळे दिल्लीचा फलंदाज मैदानावर उशिरा आल्याने हार्दिकने नाराजी व्यक्त करत पंचांकडे तक्रार केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img