3.2 C
New York

Lok Sabha Election : उत्तर मध्य मुंबईत भाजपचा ‘हा’ उमेदवार, पूनम महाजनांचा पत्ता कट

Published:

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे. तर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपने यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन ( Poonam Mahajan) यांना होणारा विरोध पाहता आता भाजपकडून या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे.

उज्ज्वल निकम महायुतीचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार

उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे आता महायुतीचे उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता उज्ज्वल निकम यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला

भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकम यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे. या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्जवल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत निकम?

उज्जवल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. निकम हे मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश होते. आई गृहिणी होती. बीएससी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनीही जळगावमधून कायद्याची पदवी घेतली. तिथल्या जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्य स्तरावरील केसेस लढण्यास सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील केसेसही हाताळण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम यांनी आतापर्यंत 628 हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचं काम केलं आहे. तर 37 आरोपींना मृत्यूची शिक्षा मिळवून दिली आहे. हायप्रोफाईल केसेस हाताळत असल्यामुळे त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img