वर्षानुवर्षे ‘तारक मेहता का उलट चष्मा’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता गुरुचरण सिंगच्या (Gurucharan Singh) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण बेपत्ता झाला असून. त्याचा शोध सध्या सुरु आहे. गुरुचरणला बेपत्ता होऊन चार दिवस झाले आहेत, याबाबत पोलिसानंकडून शोध जारी आहे. अभिनेता नेमका कुठे आहे, या बाबत कोणालाच कल्पना नाही. सोशल मीडियावर गुरुचरण प्रचंड सक्रिय असतो. आई वडीलांनी दिल्ली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुचरण मुंबई, दिल्लीसह कुठेही नसल्याचे पोलीस म्हणतात. पण या प्रकरणात, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २२ एप्रिल रोजी गुरुचरण दिल्लीहून मुंबईकडे निघाला होता. सकाळी ८:३० च विमान होत त्याच. मात्र, गुरुचरण विमानात बसलाच नाही. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पैशांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अभिनेत्याच अपहरण झाल्याची शक्यता आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या मनोरंजन विश्वात ह्या माहितीनंतर खळबळ माजली आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्याने मालिका सोडल्याचा देखील विधान केलं होत. ज्यात मालिकेत काम केल्यानंतर मानधन उशिराने मिळत असल्याची वार्ता अभिनेत्याने केली होती.