21 C
New York

Fake Shivsena : नकली शिवसेनेने हिंदुत्व गमावलेय – मोदींची टीका

Published:


कोल्हापूर : राम मंदिराला विरोध करणारा काँग्रेस सत्ता आल्यास कलम ३७० (Article 370) पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत आहे. बाळासाहेब आज हयात असते तर त्यांना या गोष्टीचे खूप वाईट वाटले असते. सनातन धर्माला विरोध करणाऱ्या एजंटसोबत जाऊन उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना (Fake Shivsena) हिंदुत्व गमावून बसली आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

कोल्हापूर येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहू छत्रपती यांचा नामोल्लेख टाळत काँग्रेसवर हल्ला चढवला. मोदी यांनी जगात भारी कोल्हापुरी, अशी घोषणा करत कोल्हापूरच्या जनतेला जवळ केले. राम मंदिर होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने राम मंदिराच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. तरीही राम मंदिर ट्रस्टने काँग्रेसला माफ करून श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिले. पण, त्यांनी हे निमंत्रण नाकारून अवमान केला.
काँग्रेसचे राजपूत्र तुमच्या संपत्ती, महिलांचे दागिने आणि सोन्याची चौकशी करणार आहे. कांग्रेसने ही तुमची संपत्ती या देशावर ज्यांचा हक्क आहे, त्यांना वाटून देणार आहे. काँग्रेसने घोषणा केली आहे की, तुमची आयुष्यभर जेवढी संपत्ती जमा करणार, तुम्ही जेवढी कमाई करणार, ते तुम्ही तुमच्या मुलांना वारसाला देऊ शकत नाही.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मोदी म्हणाले, “वारसा संपत्ती कर लादून काँग्रेस तुमच्या कमाईतला अर्धा हिस्सा काढून घेण्याच्या विचारात आहे. तुम्ही आयुष्यभर कष्टाने जमा केलेली पुंजी काँग्रेसला लुटू देणार का. गरीबांचा अपमान करणारी काँंग्रेस आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुणगान गात आहे. त्यांना देशात कर्नाटक मॉडेल लादायचे आहे.”

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, “डीएमके पक्ष सनातन धर्माला विरोध करतोय. तरीही त्यांचा काही लोक सन्मान करतात. आज बाळासाहेब असते तर त्यांना किती दुःख झाले असते, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करत टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img