3.6 C
New York

Congress : काँग्रेसमध्ये आरिफ नसीम खान नाराज, स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Published:

लोकसभेच्या रणसंग्रामात या पक्षातून त्या पक्षात जाणं हे सुरूच असतं. तसंच, पक्षात आपल्याला उमेदवारी मिळत नसल्याने मोठी नाराजी अनेक नेत्यांमध्ये असते. आता एआयएमआयएम या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी (Congress) काँग्रेस नेते माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना ऑफर दिली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रमध्ये आरिफ नसीम खान नाराज आहेत.

स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

काँग्रेसला सोडा, एकदा हिंमत दाखवा मुंबईत तुम्ही सांगाल त्या लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देऊ अशा शब्दांत छत्रपती संभाजीनगरचे लोकसभा उमेदवार इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना ऑफर दिली आहे. दरम्यान, खान यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचार समिती आणि पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच, गेली अनेक दिवसांपासून आपण पक्षाचं काम करत आहोत असंही ते म्हणाले आहेत.

एक तरी जागा मुस्लीम समाजाला सोडायला हवी होती

मी वारंवार महाविकास आघाडीबद्दल बोललो आहे. यांना मुस्लिमांची मत हवी आहेत. मात्र, मुस्लीम नेतृत्व नकोय. आज महाराष्ट्रातील उमेदवार पातळीवर परिस्थिती पाहिली तर, महाराष्ट्रात यांनी एकही जागा मुस्लिम उमेदवाराला दिली नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने मुंबईत नाही तर किमान महाराष्ट्र एक तरी जागा मुस्लीम समाजाला सोडायला हवी होती अशी अपेक्षाही जलील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

उमेदवार दिला असेल तर तो मागे घेऊ

नसीम खान यांना ऑफर देताना इम्तियाज जलील म्हणाले, नसीम खान यांनी राजीनामा नाही पक्षालाच लाथ मारायला पाहिजे होती. तसंच, खान यांना लक्षात यायला हवं की काँग्रेसला मुस्लीम समाजाचं नेतृत्व नाही तर मतं हवी आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही मुंबईतील कोणतीही जागा सांगा. तुमची मागणी असेल तो मतदारसंघा देऊ. तिथे उमेदवार दिला असेल तर तो मागे घेऊ. तुम्ही फक्त हिंमत दाखवा अशा शब्दांत जलील यांनी खान यांना जोरदार ऑफर दिली आहे.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक…

यावेळी नसीम खान यांनी अल्पसंख्यांक समाजातील लोकांची माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात असे अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे 30 ते 35 टक्के अल्पसंख्यांक लोक आहेत. मराठवाडा, विदर्भ, मुंबईतील सहा लोकसभांमध्ये 25 ते 30 टक्के मतदार आहेत. पण तरी देखील एकाही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने एकही उमेदवार का दिला नाही, हा जो प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळेच मी सुद्धा स्टार प्रचाराचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे खान यांनी सांगितले.

इथून पुढे काँग्रेसचा प्रचार नाही…

या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रचार केला. पण यापुढे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी कोणताही प्रचार करणार. त्यासाठीच मी राजीनामा दिला आहे. जी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, ती मी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना सांगितली आहे. हा प्रश्न एकट्या नसीम खानचा नाही किंवा अन्य काही नाही. प्रश्न अल्पसंख्यांक समाजाचा आहे. आजवर राजस्थान, कर्नाटक, गोवा, गुजरात व अनेक राज्यात पक्षाचा प्रचार केला, पण आता ते शक्य नाही. काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गाकवाड यांना माझ्या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली असली तरी मी त्यांचा प्रचार करणार नाही, पण माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला सांगेन, असे नसीम खान यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img