23.1 C
New York

Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात, 28 जण जखमी

Published:

अकोला मार्गावर खासगी बसचा (Bus Accident) मोठा अपघात झाला आहे. इंदोरहून (Indore To Akola) अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवाशी बस दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस 100 फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. बसमधील 28 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बस मध्ये 40 ते 45 प्रवासी होते. सुदैवाने जीवित हानी नसून जखमी ना उपचारासाठी नेण्यात आले. प्राप्त माहिती नुसार इंदोर वरून अकोला येणारी( रॉयल ट्रॅव्हल ) मध्यप्रदेश मधील शिकारपूरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोरोली घाटात जास्वंदी आदिवासी गावाजवळ दरीत कोसळली. या मध्ये महाराष्ट्रात येणारे 40 ते45 प्रवासी संख्या असल्याचे समजते. बस कोसळल्या ची माहिती मिळताच जास्वंदी येथील सरपंच शब्बीर तडवी यांनी नागरिकांसह घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमी ना बस मधून काढून उपचारासाठी ग्रामपंचायत मध्ये व्यवस्था करून चाय पाणी नास्टा दिला. तातडीने शिकारपुरा पोलीस ही घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केल्याचे समजते.

सकाळी साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला. इंदोरवरुन अकोल्याकडे ही बस निघाली होती. मात्र मध्येच ही बस जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात दरीत कोसळली. रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस होती. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झालं. मध्यप्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पाहणी करताच 28 रुग्ण जखमी असल्याचं दिसलं. या सगळ्या जखमींना दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. 28 जखमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img