मुंबई
सध्या संपूर्ण देशासह जग आयपीएलच्या (IPL) रंगात रंगले आहे. आयपीएल नंतर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या ब्रँड अँम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून भारताचा ऑलराऊंडर माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या (ICC) सोशल मीडियाच्या अकाउंट वरून ही माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. युवराज सिंह याचा आयसीसीने मोठा सन्मान केला आहे. आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी युवराज सिंहला मोठी जबाबदारी दिली आहे.
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एक ते 29 जून दरम्यान खेळली जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये संयुक्तरीत्या खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहे. या संघाचे 5-5 असे 4 गट तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये अमेरिका, कॅनेडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं या टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे.तर लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक
विरुद्ध आयर्लंड, 5 जून
विरुद्ध पाकिस्तान, 9 जून
विरुद्ध अमेरिका, 12 जून
विरुद्ध कॅनेडा, 15 जून