बॉलीवूडची इश्क सुफियाना म्हणजेच.. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकत असते. चाहत्यांना विद्याच्या आगामी चित्रपटांची नेहमीच उत्सुकता असते. काही दिवसांपूर्वी विद्याचा ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. चित्रपटात विद्याने केलेल्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केलं जातंय. विद्या सध्या चित्रपटाचं प्रमोशन करतेय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच विद्यानं एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. ह्या मुलाखतीमध्ये विद्याने चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्धल सुद्धा सांगितलं आहे.
विद्याला सिगारेटच्या व्यसनाबद्धल प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देत विद्या म्हणाली, “मला असं वाटतं की मी ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर सांगितली नाही पाहिजे पण मला स्मोकिंग करायला आवडते. सिगारेट ओढल्यानं जर शरीराला कोणताही त्रास नसता झाला तर मी सिगारेट ओढली असती. मला सिगारेटच्या धुराचा वास खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी बस स्टॉपवर धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे आणि सिगारेटच्या धुराचा वास घ्यायचे. डर्टी पिक्चर चित्रपटानंतर मला सिगारेटची सवय लागली. मी दिवसातून 2-3 सिगारेट ओढायचे.” असं विद्या म्हणाली.
“तू कधी गुटखा खाल्लायस का?”, असा देखील प्रश्न विद्याला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत विद्या म्हणाली, “अजिबात नाही”
विद्याचा ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. ‘दो और दो प्यार’ चित्रपटात एलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधी यांची देखील महत्वाची भूमिका आहे. चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले असून मिळालेल्या माहितीनुसार, ह्या चित्रपटानं ३.४३ कोटींची कमाई केली आहे. आता प्रेक्षक विड्याच्या आगामी चित्रपट येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.