23.1 C
New York

Reishi Mushroom : ‘रेशी मशरूम’ तुम्हाला ठेवेल या आजारांपासून दूर

Published:

काही फळभाज्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यातीलच एक म्हणजे मशरूम. (Reishi Mushroom) जगात मशरूमच्या जवळपास दीड ते दोन लाख प्रजाती आहेत. पण, त्यातील केवळ ३०० प्रजातीचे मशरूम खाण्यायोग्य आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे रेशी मशरूम. लिंगझी किंवा गॅंडेर्मा ल्युसीडम या शास्त्रीय नावाने हे मशरूम ओळखले जातात. आशियामधले रेशी मशरूम (Reishi Mushroom) गरम आणि दमट जागांमध्ये वाढतात. रेशी मशरूम हे ताजे ताजे किंवा पावडर आणि अर्क स्वरूपात सुद्धा खाल्ले जाऊ शकते. या मशरूमचे आरोग्यदायी फायदे आजाणून घेऊ…

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पांढऱ्या पेशींची संख्या वाढवण्यात रेशी मशरूम उपयुक्त आहे. जळजळ कमी करते व लिम्फोसाईटचे कार्य सुधारते, ज्यामुळे कर्करोग आणि संसर्गाविरूद्ध लढायला मदत करते.

अँटीकँसर गुणधर्म
रेशी मशरूम कर्करोगाशी निगडीत गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

थकवा आणि नैराश्य कमी करण्यासाठी
रेशी मशरूमचे नियमित सेवन केल्याने थकवा आणि नैराश्य कमी होईल. बऱ्याच लोकांनी रेशी मशरूमचे सेवन केल्याने चिंता आणि थकवा कमी झाल्याचे म्हंटल आहे.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी
ह्या मशरूममुळे कोलेस्ट्रॉल, एचडीएल आणि ट्रायग्लिसेराईड्स सुधारू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर चमक सुद्धा येते ह्या कारणामुळे रेशी मशरूम त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात ट्रायटरपीन्स पॉलिसेकेराइड्स, आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे घटक असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img