23.1 C
New York

Sharad Pawar Group : करमाळ्याचे माजी आमदार शरद पवार गटात

Published:

करमाळा

शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार साहेब म्हणाले की, विविध राजकीय संघटनांमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. लोकांचे काम करण्याची भूमिका पाटील यांनी करमाळा तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे शरद पवार म्हणाले.

“1972 साली मी या जिल्ह्याचा काही वर्षे पालकमंत्री होतो. विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी दुष्काळ पडला. या काळात संकटग्रस्त लोकांना काम देण्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लोकांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. दुष्काळात जनावराला चारा नव्हता. शेवटी आम्ही गुजरातमधून अमूल कृषी संस्थेतील प्रमुख लोकांना निमंत्रण दिलं आणि त्यांच्याकडून गुजरातमधून चारा आणला. त्याचवेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून अमूल संस्थेच्या अध्यक्षांवर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. काय गुन्हा केला त्यांनी, असा सवाल शरद पवार यांनी केला.

“शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. त्यालाही जीव प्यारा आहे. पण, जगणं जेव्हा अशक्य होतं, ज्यावेळी समाजात स्वाभिमानाने भूमिका घेता येत नाही, त्यावेळी माणूस आत्महत्येच्या रस्त्याला जातो. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आम्ही ७१ हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. आणि आत्महत्या थांबल्या. आज पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. यासाठी अनेक सवलती द्यायला पाहिजेत,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img