3.6 C
New York

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पंजाबमधून आणखी दोन आरोपींना अटक…

Published:

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. ही घटना रविवार १४ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हदरून गेली. मुंबई गुन्हे शाखेने मवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या माहितीनुसार, गुजरात मधील वापी नदीतून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि ४० जिवंत कडतूस जप्त करण्यात आली.

दोन दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर हत्यार शोधण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले. मात्र, आता आणखी दोन आरोपींना पंजाब येथून अटक केली असून मुंबई पोलिसांचे पथक गुरूवारी रात्री आरोपींना घेऊन मुंबईत दाखल झाले. या दोन्ही आरोपींवर शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे.
तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. याबाबतही पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. अटक आरोपींपैकी एक बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.


दक्षिण पंजाबमधून सोनू सुभाष चंदर (३७) व अनुज थापन (३२) यांना अटक करण्यात आली होती. व्यवसायाने चंदर शेती आणि किराणा दुकान सांभाळतो. तर थापन हा ट्रक मदतनीस म्हणून कार्यरत आहे. बिश्नोई गॅंगकडून त्यांना शस्त्र पुरवण्यात आली होती. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे, तीन मॅगझिन पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी १५ मार्च रोजी चंदर व थापन पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये ३ तास थांबवले होते.


पोलीस पथक आरोपींना घेऊन गुरूवारी रात्री उशीरा मुंबईत दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्ता व पाल यांना पिस्तुल देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img