3.6 C
New York

Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नसीम खान नाराज

Published:

पक्षाचा प्रचार करणार नाहीत

मुंबई

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा पारंपारिक मतदार संघ दक्षिण मध्य मुंबई असताना त्यांना उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसने उमेदवारी दिल्याने पक्षात नवा वाद उफाळला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान नाराज झाले आहेत. त्यांनी संताप व्यक्त करत काँग्रेसच्या प्रचारक यादीतून राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेचे ४८ मतदार संघात महाविकास आघाडीने एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. किमान काँग्रेस एका तरी मुस्लिम उमेदवाराला संधी देईल, अशी समाजाची अपेक्षा होती. काँग्रेसला मुस्लिमांची मते हवीत,पण उमेदवार नकोत असा सवाल आता जनता आम्हाला करू लागली आहे म्हणून आपण स्टार प्रचारक म्हणून काम करू शकत नसल्याचे नसीम खान यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये निवडणूक घोषित झाल्यानंतरच अनेक नाराजीनाटये सुरू आहेत. आता नसीम खान या महत्वाच्या नेत्याची त्यात भर पडली आहे. नसीम खान हे माजी मंत्री राहिलेले आहेत. चर्चा अशी आहे की नसीम खान हे उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण वर्षा गायकवाड यांना आता येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

नसीम खान यांनी आता थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळविली आहे. प्रचार कमिटीतून आपण राजीनामा देत असून पक्षाचा प्रचारही करणार नसल्याचे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी एकाही जागेवर काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. राज्यातील मुस्लिम समाजात त्यामुळे नाराजी आहे. काँग्रेसला मुस्लिमांची मते हवीत पण उमेदवार नको अशी चर्चा समाजात आहे. त्यामुळे आता लोकांच्या प्रश्नांना मी उत्तरे देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही जबाबदारी पार पाडू शकत नसल्याचे नसीम खान यांनी पत्रात लिहिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img