रमेश औताडे/मुंबई
सर्व राजकीय पक्षांची ७० वर्षांची गुलामगिरी संपवून आता आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन लोकसभा लढणार आहोत. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई इतर सर्व धर्माचे, पंथाचे सामान्य लोक एकत्र येऊन अखिल भारतीय मुस्लिम ( सेक्युलर ) लिगची (Muslim league-secular) स्थापना केली आहे, अशी माहिती लिगचे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान (Jamshed Amir Khan) यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
“मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्या जोगव्यासाठी वापर केला जात आहे. आमचा आवाज संसदेमधे कोण उठवणार ? हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी सतावत होता. त्यामुळे आता आम्ही अखिल भारतीय मुस्लिम लिग (सेक्युलर) या पक्षाच्या माध्यमातून आमचाच पक्ष, आमचाच झेंडा, आमचाच उमेदवार, अशी आम्ही लढाई सुरू केली आहे,” असे खान यांनी सांगितले.
हायातुल्ला अब्दुल्ला शेख, मनान अब्दुल हक, निजाम खान, इमतियाझ, अली रहीम शेख असे पाच उमेदवार लोकसभेसाठी मुंबईतून उभे केले आहेत, अशी माहिती लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी यावेळी दिली.