3.6 C
New York

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा प्रेग्नेंसीबाबत मोठा निर्णय!

Published:

बॉलिवूडसह टॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) मोठा निर्णय घेतला आहे. मृणाल तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना ती तिच्या आयुष्यातले अपडेट देत असते. मध्यंतरी मृणालने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रडत असल्याचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोबाबत मृणालने चाहत्यांना स्पष्टीकरण देखील दिले. त्यावर मृणाल म्हणाली, काही विशिष्ट दिवस तिला तिच्या अंथरुणातून उठायचे नव्हते. यापुढे मृणाल म्हणाली, “तिला अनेकदा बॉडी शेमिंग आणि ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो.

मृणालने मोठा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती चाहत्यांना देत तिने गर्भाशयाची अंडी गोठवण्याबाबत भाष्य केले. अभिनेत्री मोना सिंगने गर्भाशयाची अंडी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी मृणाल म्हणाली, रिलेशनशिप कठीण असत करण तुम्हाला तुमच्या कामाचे स्वरूप समजणारा योग्य जोडीदार हवा. त्याने तुम्हाला समजून घेतले पाहिजे. मी देखील गर्भाशयाची अंडी गोठवण्याबाबत विचार करत असल्याचे तिने सांगितले.

कुटुंबाविषयी सांगताना ती म्हणाली, “कुटुंबाशिवाय इतर कोणीही काळजी घेत नाही. मला जेव्हा अंथरुणातून उठायचे नव्हते तेव्हा अनेकांनी टीका केल्या मात्र माझ्या कुटुंबानीच मला साथ दिली. त्यामुळे जर वाईट दिवस आले तर चांगले दिवस देखील नक्की येतात.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img