23.1 C
New York

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी केले मराठा समाजाला मतदानासंदर्भात ‘हे’ आवाहन

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. यामध्ये राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मतदानापूर्वी मराठा समाजाला प्रसार माध्यमांशी बोलताना मोठे आव्हान केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांना निवडणुकीमध्ये असे पाडा की पुढील अनेक निवडणुकीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात आले नाही पाहिजेत. मराठा समाजाचे उमेदवार जरी निवडणुकीमध्ये नसले तरी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांना पाडण्यातही आपला विजय आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मनोज जरांगे यांची महाराष्ट्रात दौरा सुरू असताना प्रकृती खालावली होती त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी रुग्णवाहिकेतून मनोज जरांगे मतदार केंद्रावर आले होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण विधेयकाला, सगेसोयरे अध्यादेशाच्या बाजूने आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्या मराठा समाजाला सहकार्य करायला हवं. मी मराठा समाजातील मतदारांना म्हटले की कुणालाही मतदान कराण समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img