23.1 C
New York

Kiran Pawaskar : ठाकरे गटाचा वचननामा शिवसैनिकांसाठी अपचननामा किरण पावसकर यांची खरमरीत टीका

Published:

मुंबई

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर (Savarkar) यांचा उबाठाला (Uddhav Balasaheb Thackeray) विसर पडला आहे. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या नावाने मते मागणारा उबाठा गटाचा (UBT) वचननामा (Manifesto) शिवसैनिकांसाठी अपचननामा आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी केली. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी माफीनामा काढला आहे, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात उबाठा नाव चालणार नाही, म्हणून बाळासाहेबांचा मोठा फोटो लावून मत मागण्याची केविलवाणी धडपड उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे, सावरकर यांचा साधा उल्लेख देखील केलेला नाही, ही उबाठासाठी शरमेची बाब आहे, असे किरण पावसकर म्हणाले. वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे, सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी तरी किमान मागणी करायला हवी होती. बाळासाहेबांचा फोटो लावल्यामुळे जे मुद्दे वचननाम्यात अभिप्रेत होते, ते त्यात नसल्याचे पावसकर यांनी सांगितले.

वचननाम्यातील मुद्द्यांवरुन पावसकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. शरद पवार यांनी विधीमंडळात आणि संसदेत इतकी वर्ष काय केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोविडमध्ये झालेल्या मृत्यूंची आकडेवारी, भ्रष्टाचार समोर यायला हवा. तुमच्या नेत्यांकडून कोविडमध्ये केलेली वक्तव्ये देखील जनता विसरलेली नाही, असे पावसकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भांडूप, मुलुंड, वरळीमधील २२ फार्मा कंपन्या मुंबईतून निघून गेल्या. मुंबईतील गिरण्या बंद करण्याचे पाप कोणाचे? ज्यांचे रोजगार युनियनच्या माध्यमातून गेले त्यावर उबाठाने उत्तर देणे आवश्यक आहे. कंपन्या गुजरातल्या गेल्या म्हणून आरोप करायचे आणि मतांसाठी वरळीमध्ये ‘केम छो वरळी’ म्हणून बोर्ड लावायचे अशी उबाठा गटाची दुतोंडी भूमिका जनतेने बघितलेली आहे.

महिलांचा सन्मान यावर बोलणाऱ्या उबाठांनी मुख्यमंत्री असताना कंगना राणावत, खासदार नवनीत राणा, स्वप्ना पाटकर यांच्यावर कारवाई केली. केतकी चितळेवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. हा उबाठांचा महिला सन्मान आहे का? असा सवाल किरण पावसकरांनी उपस्थित केला.

बाळासाहेब ठाकरे समान नागरी कायदा कधी बनेल, कलम 370 हटवा, राम मंदीर कधी होणार याबाबत नेहमी विचारायचे. मात्र तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून समान नागरी कायद्याला विरोध करत आहेत. बाळासाहेबांचा फोटो लावून मत मागण्याची उबाठाची केविलवाणी धडपड जनता ओळखेल आणि जनता मतपेटीतून त्यांना जागा दाखवेल, असा विश्वास किरण पावसकर यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img