26.6 C
New York

Karina Kapoor : अपंगांच्या क्रिकेट प्रीमियर लीगला करीना कपूरची उपस्थिती

Published:

रमेश औताडे/मुंबई
व्हीलचेअर स्पोर्ट्स असोसिएशन (Wheelchair Sports Association) मुंबईच्या वतीने खार जिमखाना येथे मुंबई हिरोस, मुंबई राइनोज आणि मराठवाडा टायगर्स यांच्यात मुंबई व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ (Mumbai Wheelchair Premier cricket league) चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय महिला संघाच्या माजी क्रिकेटपटू आणि BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्या मिस सुलक्षणा नाईक या लीगसाठी प्रमुख पाहुण्या होत्या तसेच अभिनेत्री करीना कपूर खान (Karina Kapoor) देखील उपस्थित होती.

व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू ७० टक्के ते ९० टक्के शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत, ते व्हीलचेअरवर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतात. या संघात पोलिओ, अँप्युटी, पाठीच्या कण्याला दुखापत आणि सेरेब्रल पाल्सी यासारख्या विविध अपंगत्व असलेल्या सर्व खेळाडूंचा समावेश आहे. मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत.

अंतिम सामना मराठवाडा टायगर्सने मुंबई राइनोजवर ११ धावांनी जिंकला. मराठवाडा टायगर्सच्या अंतिम सामन्यात विश्वनाथ गुरव सामनावीर ठरला.
साहिल सय्यदला सर्वोत्कृष्ट फलंदाज, राहुल कारचे याला सर्वोत्कृष्ट ब्लोअर आणि संतोष रांजगणे याला लीगचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना अधिकाधिक क्रिकेट सामने खेळण्याची संधी देण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि नजीकच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनने व्हीलचेअर क्रिकेटपटूंसाठी अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी अशी आमची इच्छा आहे. असे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल रामुगडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img