महाराष्ट्रावर (Maharashtra) एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणात (Kokan Region) उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. राज्यात विदर्भात ५ तर मराठवड्यातील ३ जिल्ह्यात मतदान होत आहे. मात्र, या मतदानावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, येथे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना वगळून राज्यात यलो अलर्ट जारी केले आहे. मुंबई मध्ये तापमान 36 अंश सेल्सिअस असेल. मुंबईत आकाश निरभ्र राहील हवामान कोरड असेल. येत्या आठवड्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईसह या भागात उष्णतेची लाट
हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासात राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे व परिसरामध्ये २९ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच २६ व २७ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुढील काही दिवस मुंबईतील हवामान हे कोरडं असणार असून तापमानामध्ये वाढ होणार आहे. MD कडून मिळलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारपासून शहराच्या तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. तसेच सोमवारपर्यंत तापमान 39 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे,त्यामुळे पुन्हा एकदा ‘हिट वेव्ह’चा सामना मुंबईतील नागरिकांना करावा लागू शकतो.
IMD मुंबईच्या हवामान शास्त्रज्ञांनी असे सांगितले की आजून पर्यंत कोणतीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाही. किनारपट्टीच्या भागात तापमान 37 अंशांच्या पुढे गेले की उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. तसेच शहरी भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जास्त करून 40 अंश सेल्सिअसवर तापमान गेल्यावर देण्यात येतो. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. दरम्यान 16 एप्रिल रोजी मुंबईचे तापमान 39.7 अंशांवर पोहोचले होते आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
तसेच मुंबईच्या वाढत्या तापमानाबाबत एका कार्यक्रमात बोलताना, IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले की, मागील काही वर्षात मुंबईच्या तापमानात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, समुद्रातील पृष्ठभागाचे तापमान देखील वाढत आहे. याच कारणाने चक्रीवादळ, अवकाळी याचे प्रमाण देखील वाढेल आहे.