23.1 C
New York

Fish Tunnel Carnival : डोंबिवलीत प्रथमच फिश टनेल कार्निवल जत्रा

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले ‘मामाच्या गावाला’ जाऊन धम्माल करतात. कल्याण डोंबिवली (Dombivli) व परिसरातील मुलांसाठी डोंबिवलीत प्रथमच कल्याण-शीळ रस्त्यावरील जुन्या प्रीमियम ग्राऊंवर फिश टनेल (FISH TUNNEL) कार्निवल जत्रा भरविण्यात आली आहे. तब्बल महिनाभर म्हणजे 21 जून पर्यत जत्रा (Fish Tunnel Carnival) सुरु राहणार असून जत्रेच्या पहिल्या दिवशी बच्चेकंपनीने गर्दी केली होती.

शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. महेश पाटील, ह.भ. प हनुमान महाराज, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील रवि थोरवे धनेश पाटील महेंद्र पाटील, महेश हिवाळे, साईराज चव्हाण प्रविण मोरे आदी उपस्थित होते. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी हंगामात मुलांबरोबर पालकांना आपल्याच शहरात फिश टनेल कार्निवलचा आनंद घेता यावा यासाठी हा जत्रोत्सव आयोजित करण्यात आल्याचे ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उन्हाळी सुटीत मुलांबरोबर पालकांनाही माशांचे जग पहायचे असेल किंवा भेट द्यायची असेल तर आयोजित केलेल्या २५ एप्रिल ते ३० जून असा एक महिन्याच्या फिश टनेल कार्निवला खूप मजा येईल. येथे विविध प्रजातींचे शेकडो लहान-मोठे आकर्षक विदेशी मासे पाहायला मिळतील. डोंबिवलीत पहिल्यांदाच असा पाण्याखालचा फिश बोगदा पाहायला मिळणार आहे. इथे गेल्यावर तुम्ही समुद्राखालून कुठल्यातरी परदेशी ठिकाणी फिरत असल्याचा भास होईल. येथील आकर्षक दिवे आणि रंगीबेरंगी मासे खूप आवडतील असेच आहेत. विशेष म्हणजे गोड्या पाण्यातील समुद्रातील मासे पहावयास मिळणार आहेत. फिश टनेल कार्निवल विषयी आयोजक महेंद्र पाटील म्हणाले, आमचा उद्देश आहे की या जत्रेत गरीब मुलांना आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम आहे. पूर्वी खारघर, नवी मुंबई मध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम बघण्यात आला होता. आपल्या शहरातही व्हावा अशी इच्छा होती त्याप्रमाणे हा कार्यक्रम होत आहे.

यावेळी उदघाटक तथा प्रमुख पाहुणे महेश पाटील म्हणाले, हा उपक्रम म्हणजे प्रत्यक्ष पाण्यात जाऊन हे सर्व बघतोय असा भास होतो. फिश टनेल कार्निवल जत्रोत्सव बरोबर खवय्यांना खास पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. तसेच विविध प्रकारच्या खेळण्यामधून मौजमस्ती करता येणार आहे. महिनाभर मुलांबरोबर पालकांना सुट्टीचा आनंद घेता येईल.यावेळी मी पहिल्यांदाच फिश टनेल कार्निवल जत्रेला भेट देण्यासाठी आले आहे. तो खूपच छान दिसतो, माशाखालील पाण्याचा बोगदा प्रथमच पाहिला आहे. आत्तापर्यंत अशा गोष्टी चित्रपटात किंवा मोबाईल फोनवर पाहिल्या होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img