8.7 C
New York

Sanju Rathod : गुलाबी साडी…कोणाचा आवाज आहे हा? कसं सुचलं गाणं? जाणून घ्या…

Published:

सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणतं गाणं धुमाकूळ माजवेल, सांगता येत नाही. सध्या ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) ह्या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत हे गाणं वादळासारखं व्हायरल होताना दिसतंय. पण ह्या गाण्याच्या मागे आवाज कोणाचा हे तुम्हाला माहितेय का? कशी सुचली ह्या गाण्याची कल्पना? त्याबद्धल सर्व माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

नुकताच फिल्मफेअर (Filmfair) मराठी पुरस्कार २०२४ चा सोहळा पार पडला. ‘गुलाबी साडी’ हे गाणं ह्या सोहळ्यादरम्यान मंचावर सादर करण्यात आलं. गायक संजू राठोडने (Sanju Rathode) हे गाणं गायलं असून त्यानेच ते लिहिलं सुद्धा आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्याने सर्वाना वेड लावलं आहे. जिकडे तिकडे ह्याच गाण्याची हवा आहे. गाण्याचे बोल आणि हुक स्टेप्स सुद्धा अनेक कलाकार करताना दिसतात. पण, जे गाणं संजू राठोडला सुचलं तरी कसं ? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. त्याने नुकतंच ह्यावर भाष्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजूने सांगितलं ‘गुलाबी साडी’ हे गाणं मी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लिहिले होते. माझ्या डोक्यात एकच प्रश्न सुरु होता की आता काय करायचे? तेव्हा काही कारणांमुळे मी दिवाळीला घरी देखील गेलो नव्हतो. मग घरी बसून काय करायचे असा प्रश्न सारखा डोक्यात येऊ लागला. तेव्हा वाटू लागले की नवीन काहीतरी शोधायला हवं. प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो हे वाटलेलं आणि नऊवारी साडी हे गाणं होतेच. मग नऊवारी साडीचा सिक्वेल आहे तर त्याच्याशीच संबंधित गाणे तयार करायला हवे. म्हणून मग मी गुलाबी साडी हे गाणं तयार केले’ असे संजू म्हणाला.

‘गुलाबी साडी’ ह्या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर संजू राठोडने गायलेलं अजून एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. नव्या गाण्याचं नाव ‘bride तुझी नवरी’ असे आहे. या गाण्यात डान्सर वैष्णवी पाटील आणि ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आहे. संजू राठोडच्या रॅप गाण्यांनी सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. ह्या नव्या गाण्याला यूट्यूबवर १.६ मिलियन लोकांनी पाहिलंय तर ‘गुलाबी साडी’ हे गाणं ७४ मिलियन लोकांनी पाहिलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img